जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; तर युजर्स म्हणाले विनोद करताय का पेड ट्विट ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहायला मिळतोय. सद्यस्थिती हि आधीहून अधिकच बिकट होत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्था अपुऱ्या पडताना दिसत आहेत. औषध, ऑक्सिजन आणि रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अशा परीस्थितीत बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत महाराष्ट्राकडून इतरांनीही शिकायला हवे, असा सणसणीत टोला लगावला आहे. त्याच्या या ट्विटमुळे केंद्र सरकारला काय फरक पडला ते ठाऊक नाही पण युजर्सना नक्कीच फरक पडलाय. त्यांच्या ट्विटमुळे युजर्सने महाराष्ट्रातील सद्यःपरिस्थितीचा आरसा दाखवत त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले आणि त्यांचे हे ट्विट क्षणातच व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत, केंद्र सरकारला अप्रत्यक्षणपणे टोला लगावला आहे. या ट्विटमध्ये गीतकार जावेद अख्तर म्हणाले आहेत कि, ‘महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. तरी देखील सरकार आणि बीएमसी जबरदस्त क्षमतेने काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे,’. या अश्या आशयाचे ट्विट करीत जावेद यांनी एका प्रकारे महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे. पण यांचे हे ट्विट आवडले नाही. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांना यासाठी ट्रोल केले. ‘महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत, सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशात महाराष्ट्राकडून काय शिकायचे?’ असा संतापजनक सवाल एका युजरने त्यांना केला.

तर काही युजर्सने काहीही बोलताय? असे विचारले आहे. अन्य एका युजरने हे ट्विट म्हणजे, ‘जोक ऑफ द डे’ असल्याचे म्हणत त्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने तर थेट हे पेड ट्विट आहे का? असा खोचट पण धारदार सवाल जावेद अख्तर यांना केला.

https://twitter.com/aayush_138/status/1391095049623011330?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1391095049623011330%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fbollywood%2Fsocial-reaction-javed-akhtar-tweet-praising-maharashtra-govt-corona-crisis-a590

यापूर्वी अनेकदा जावेद यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर थेट टीका केली आहे. कोरोना काळातही ते मोदी सरकारला वारंवार धारेवर धरत आहेत. पण कोणाला ठाऊक होते, त्यांचे हे केंद्र सरकारवर धारधार टीका करणे अश्या पद्धतीने त्यांच्याच अंगाशी येईल.

Leave a Comment