भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची (jawaharlal nehru statue) काही लोकांनी दगड आणि काठीने तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
यह विडीओ मध्यप्रदेश के सतना ज़िले का है।
जहाँ देश के पूर्व प्रधानमंत्री स्व.जवाहरलाल नेहरू जी की प्रतिमा को कुछ असामाजिक तत्व क्षतिग्रस्त कर रहे है।यह घटना बेहद निंदनीय है। pic.twitter.com/CPlDwWef3w
— Kamal Nath (@OfficeOfKNath) May 25, 2022
या व्हिडिओ शेअर करताना कमलनाथ यांनी लिहिलं, “हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. ज्यात काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची (jawaharlal nehru statue) विटंबना करताना दिसत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.” या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, काही समाजकंटक नेहरूंच्या पुतळ्यावर काठीने हल्ला तसंच दगडफेक करताना दिसत आहेत. सतना शहरातील सह जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धवरी चौकात ही घटना घडली आहे.
या व्हिडिओमध्ये पुतळ्याची तोडफोड करणारे उपद्रवी शिवराज सरकारच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत. तसेच ते जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यावर (jawaharlal nehru statue) लाठीमार आणि दगडफेक करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :
प्रिन्सिपल नवऱ्याला पत्नीकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर
दामिनी ॲप : पावसाळ्यात वीज कुठे पडणार हे कळणार 15 मिनिटे अगोदर
सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!
धक्कादायक खुलासा !!! या ग्रहांवर असू शकते एलियन्सचे अस्तित्व
Porn : …आणि वयाच्या 83 व्या वर्षी तो बनला चक्क पॉर्न स्टार !!!