व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Porn : … आणि वयाच्या 83 व्या वर्षी तो बनला चक्क पॉर्न स्टार !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Porn :  आपण आयुष्यात काही ना काही बनावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. चांगले करिअर करण्यासाठी लोकं हर एक प्रकारे प्रयत्न करतात. मात्र, काही कामं अशी असतात ज्यांच्या कडे करिअरच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे पाहिले जात नाहीत. पोर्न इंडस्ट्री देखील काहीशी अशीच आहे. तसेच यामध्ये करिअर करणाऱ्या लोकांकडेही अगदी वेगळ्याच नजरेने पहिले जाते. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका पाद्रीने वयाच्या 83 व्या वर्षी चक्क पॉर्न स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

नॉर्थ कॅरोलिनाचा रहिवासी असलेल्या या 83 वर्षीय माजी पास्टरचे नाव नॉर्म सेल्फ असे आहे. त्याने Porn फिल्म स्टार बनण्यासाठी चक्क आपली नोकरी सोडली. या रिटायर्ड पाद्रीने अलीकडेच आपल्या पहिल्या पॉर्न फिल्ममध्ये काम केले. हा अनुभव मजेदार असल्याचे त्याने यावेळी म्हंटले.

नॉर्म सेल्फने याआधी पास्टर म्हणून देखील काम केले होते, मात्र आपण समलिंगी (Gay) असल्याचे लक्षात आल्यावर त्याने काही वर्षांपूर्वी ते काम सोडले. यानंतर 2017 मध्ये त्याने एक Porn फिल्म देखील बनवली. वयाच्या 83 व्या वर्षी देखील सेक्स हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव असल्याचे नॉर्मने म्हंटले. आता आपण यापुढे देखील पॉर्न फिल्ममध्ये काम करतच राहणार असल्याचे नॉर्मने यावेळी सांगितले.

पादरी बना पोर्न स्टार, 83 साल की उम्र में बदला करियर; कहा-लाइफ का यादगार एक्सपीरिएंस

उत्तर कॅरोलिनाच्या या माजी पास्टरने (धर्मगुरू) मानवी तस्करीपासून (human trafficking) मुक्त होण्यासाठी पाठिंबा जाहीर केला. लोकांना सेक्सबाबत जागरूक करण्यात मला आनंद होत असल्याचं त्यांने सांगितले. मात्र वृद्धांसाठी हे करिअर नाही, अशा लोकांनी केलेल्या कमेंटच्या विरोधात माजी पाद्रीने जाहीरपणे संतापही व्यक्त केला आहे. Porn

हे पण वाचा :

David Miller : धडाकेबाज खेळी करत गुजरातला अंतिम पोहोचविणाऱ्या मिलरने मागितली RR ची माफी

RBI : खुशखबर !!! आता घर दुरुस्त करण्यासाठी देखील मिळणार 10 लाखांपर्यंतचे कर्ज

Honda कडून लवकरच लॉन्च केली जाणार दुसरी हायब्रिड कार !!! नवीन फीचर्सविषयी जाणून घ्या

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा