आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी सोनिया गोरे यांच्यावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी संस्था व सदस्यांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह सहा जणांवर विविध काल वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. यामध्ये भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता जुलूमार गोरे याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहार. फसवणूक प्रकरणी पोलिसांनी स्मिता कदम या महिलेला ताब्यात घेतले आहे. याबाबत आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मायणी येथील बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अनिल मेनन आणि एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तर पुढील सुनावणी 17 मे रोजी निश्चित केली आहे. त्यामुळे आमदार गोरेवर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Leave a Comment