सरकारविरोधात सर्व जातीधर्मियानी एकत्र येण्याची गरज – जयंत पाटील

0
41
Jayant Patil
Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सरकारने सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचा आव आणला पण प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी झालीच नाही. शेतकऱ्यांमध्ये आज प्रचंड अवस्थतता आहे. या सरकारविरोधात आपण एकसंधपणाने ताकद उभी केली पाहिजे. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांची ही शक्ती भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने अजूनही शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली नाही. मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी करायची नव्हती, त्यांना निवडणुकांच्या काळात कर्जमाफी देवून त्याचा फायदा करून घ्यायचा होता मात्र विरोधी पक्षांचे नेते राज्यभर फिरले आणि सरकारला नमवले. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, संविधान बदलण्याची भाषा केली जाते. महान व्यक्तींनी जो पाया घातला तो पाया हलवण्याचा प्रयत्न होतो आहे. सिस्टिम तोडली जात आहे. याकडे गांर्भीयाने पाहण्याची गरज असून त्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मौलाना आजाद यांनी शिक्षणात असे काम केले की ७० वर्षात ते कमी झालेले नाही. त्यांच्या शिक्षणातील योगदानाने क्रांती घडल्याचे सांगतानाच आजाद यांनी शिक्षणात एकच व्यवस्था हवी याचा आग्रह धरला होता. शिवाय त्यांनी सायन्सला प्राधान्य देत आयआयटीची निर्मिती केली. त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिले नसते तर आज वाईट अवस्था होती असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

आजाद यांच्या दुरदृष्टीमुळे शिक्षणात प्रगती घडली आहे त्यामुळे देशातील जनतेने त्यांच्याबद्दल आदर राखला पाहिजे असे सांगतानाच आमच्या सरकारच्या काळात मौलाना आजाद महामंडळाची स्थापना पवारसाहेबांच्या विचाराने करण्यात आली. सच्चर समितीसाठी निधीची तरतुद बजेटमध्ये करण्याचे काम केले. महाराष्ट्र राज्य पहिले राज्य आहे ज्याने बजेटमध्ये सच्चर समितीसाठी निधीची तरतुद केली आहे असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here