सांगली प्रतिनिधी | पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात सोशल मिडीयाने राज्यातील नेत्यांना चांगलेच घेरले आहे. जयंत पाटील यांच्या फेसबुक पेजवर प्रदर्शित करण्यात आलेला फोटो ,त्यांनी काढून घेत त्या फोटोत दिसणाऱ्या बॉक्स बद्दल त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. पूरग्रस्तांना मदत पोचवण्यासाठी कसलेच बॉक्स मिळत नव्हते. शेवटी १ ऑगस्टला रोजी राजाराम बापू पाटील यांच्या जयंती निमित्त शाळेतील मुलाला खाऊ वाटपासाठी वापरलेले बॉक्स आम्ही पूरग्रतांच्या मदतीसाठी वापरले असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
जयंत पाटील यांनी स्वतःच्या फोटोचे बॉक्स वापरून आपली प्रसिद्धी केल्याचा आरोप सोशल मीडियासोबत मीडियातून देखील होऊ लागला त्यामुळे त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवल्याचे चित्र होते. त्यानंतर त्यांनी स्वतः या संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटील यांनी आम्हाला आणखी बॉक्स हवे आहेत. तरी देखील ते आम्हाला येथे दुकाने बंद असल्याने मिळत नाहीत असे म्हणत बॉक्स पाठवून देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान सांगलीतील पूरस्थिती आज ९ व्य दिवशी देखील जैसे थे आहे. येत्या काही दिवसात हि पूरस्थिती दूर होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या काही रस्ते पुराच्या पाण्यातून उघडे झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळाली आहे. मात्र पाणी कमी होण्यासोबतच येथे साथींच्या रोगांनी थैमान मांडले आहे. त्यामुळे लोकांना मदत कार्यासोबत आता वैद्यकीय सेवेची देखील आवश्यकता भासू लागली आहे.