…हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कर कपात करण्याची अपेक्षा असताना सरकार कडून तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. राज्य सरकारला पेट्रोल डिझेल वर बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांचा चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले, चोराच्या उलट्या बोंबा असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. ज्या टक्केवारीने पेट्रोल डिझेलवर कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. १०० रुपये पार केले. ही पूर्णपणे जबाबदारी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्याचे कर कमी करायला लावायचे, हा पूर्णपणे राज्यांवर अन्याय आहे. केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, तर राज्यांच्या महसूलामध्येही घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन सांगावं की, आम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून द्या म्हणजे राज्यातील जनतेवरील पेट्रोल-डिझेलचा बोझा कमी होईल,” असा सल्लाही पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस –

रोज पेट्रोल-डिझेलचे फलक घेऊन येणारे सत्तापक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने २७ रुपयांपैकी एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल १० रुपये महाग आहे कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like