वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची

0
39
raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील उत्तरसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांचा वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा असला तरी विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची आहे अशा शब्दांत जयंत पाटील यांनी पलटवार केला .

२०१४ला मोदींना पाठींबा, २०१९ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर, वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या मा. बाळासाहेब ठाकरेंचा,मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत. अशी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली.

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील असा केला होता, त्यावर बोलताना काही लोक मराठी व्याकरण, काना, मात्रा विसरतात. त्यांच्यासाठी पुन्हा वर्ग सुरू करण्याची गरज आहे. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच मनसे हा विझत जाणारा पक्ष असल्याच्या आपल्या पुर्वीच्या विधानावर आपण ठाम असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here