भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चांवर जयंत पाटलांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

Jayant Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) हातातून राष्ट्रवादी गेली आहे. आता त्यांच्याच गटातील एक दिग्गज नेता देखील शरद पवार गटातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश देखील करतील असे म्हटले जात आहे. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्वतः जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

आज पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
आघाडीमध्ये भ्रमण निर्माण करण्यासाठी अशा चर्चा रंगवल्या जात असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच किती काही झाले तरी आपण शरद पवार यांच्या सोबतच शेवटपर्यंत राहणार असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या या खुलासामुळे आता राजकिय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना जयंत पाटील यांनी म्हणले आहे की, “चर्चा होतच असते, ती होऊ द्या. मी पक्ष प्रवेश सोडणार अशा बातम्या कोठून येतात मला माहिती नाही. भाजपा कडून मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आमचे लोक कुठेही जाणार नाहीत. मी दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे बैठक दिल्लीत भाजपा नेते सोबत होण्याचे कारण नाही. मी 15 वर्ष कॅबिनेट राहिलो मला मंत्री पद हे प्रलोभन होऊ शकत नाही”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर आणि निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. या दोघांनी देखील राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा आहे त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता पुन्हा पक्ष मिळवण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र आता या चर्चांवर स्वतः जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे.