महागाई, इंधन दरवाढ,घसरलेला जीडीपी हे केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट , जयंत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकरमध्ये भाजप सत्तेत येऊन 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या 7 वर्षात केंद्रसरकारने काय केले आणि काय नाही असे अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत आहे. देशात सध्या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचे दर शंभरच्या आसपास पोहचले आहेत. याचा मुद्द्यावरून मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “महागाई, इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी, हे तर केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट आहे” असे त्यांनी म्हंटले आहे.

त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, ‘कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जिडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे’ . त्यांच्या ट्विट सोबत त्यांनी एक विकदर कोसळल्याच्या बातमीचा फोटो देखील दिला आहे.

सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) 7.3 टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1979-80 या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे 5.2 टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे 7.3 टक्क्यांवर घसरला आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

Leave a Comment