हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. अशावेळी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभे राहण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही’ असं पाटील यांनी स्पष्ट केले.’पार्थ पवार यांच्याबद्दल अमरजित पाटील यांनीच मागणी केली आहे. पण हा आमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांच्या मागणीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील’, असंही पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत पार्थ यांचा पराभव
पार्थ पवार यांनी मावळ या मतदारससंघातून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले होते. आपल्या पहिल्याच निवडणुकीत पार्थ यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी श्रीरंग बारणे यांना 7 लाख मतं मिळाली होती. तर पार्थ पावर यांना 4 लाख 97 हजारांच्या घरात मतं मिळाली होती. दरम्यान, त्यांच्या परभवाची अनेक कारणं असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात आलेलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’