कराड लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जयंतकाका पाटील यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड शहरातील लोकशाही आघाडीच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लोकशाही आघाडीचे नेते सुभाषराव पाटील यांनी आघाडीतील नव्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड केल्याची घोषणा केली. यामध्ये आघाडीच्या अध्यक्षपदी जयंतकाका पाटील, उपाध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विद्याराणी साळुंखे, डॉ. सतीश शिंदे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव मुसदिक अंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सहखजिनदार राकेश शहा यांची निवड केली असल्याची माहिती लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याकराड येथील पत्रकार परिषदेला अध्यक्ष जयंतकाका पाटील, नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुभाषराव पाटील म्हणाले, १६ सालापासून आजतागायत प्रशासकीय राजवट असली तरी कारभार झाला. कोणतीही आघाडी असो. त्या आघाडीचा अध्यक्ष सभागृहात पाहिजे. सभागृहात जर लोक चुकीचे वागले तर आघाडीच्या अध्यक्षाने त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर नाही. आणि आघाडीची दर महिन्याला सर्वसाधारण सभेच्या अगोदर बैठक झाली पाहिजे. दुर्दैवाने मागच्या पाच वर्षात असं न झाल्यामुळे एका कोपऱ्यात एक निर्णय झाला तर दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा निर्णय झाला. लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बोलणेच सोडून दिले आहे. लोकशाही आघाडीचे सहा नगरसेवक आहे. मात्र, काहींनी सत्तेत नसले तरी रुबाबात जाऊन कोरोनात काम केले. कराड शहरात नगरसेवकांना मेहरबान म्हणत जात का तर त्यांनी समाजात जेवढं समर्पित होऊन काम केले त्यामुळे म्हंटले जाते.

सुभाषराव पाटील म्हणाले, या पालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. संपूर्णपणे लोकशाही आघाडी हि राज्य सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचाराने चालणार आहे. मुजावर कॉलनीतील घरातील ड्रेनेजचे कनेक्शन पालिकेने जोडणे गरजेचे आहे. राजकीय वाईट हेतू मनात ठेऊन पालिकेने तेथील कनेक्शन जोडलेले नाही. हि लंके आपल्याला साथ देत नाहीत म्हणून काही नगरसेवकांनी तेथील कामे केली. पैसे मिळणार नाहीत या भीतीपोटी ठेकेदार काम केले नाही. सत्तेवर असलेल्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवणे गरजेचे होते. मात्र, त्यांना तो जमला नाही. मात्र, येथील लोक आपल्याला दाद देत नाहीत. त्यांना कामाबद्दल तळमळ नाही.