२०११ ची भारत-श्रीलंका वर्ल्डकप फायनल फिक्स होती? जयवर्धने म्हणतो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी २०११ ची विश्वचषक स्पर्धा फिक्स असल्याचा दावा केला होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते,  “२०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी क्रीडामंत्री असतानाच हा प्रकार घडला आहे. अत्यंत जबाबदारीने मी हे सांगतो आहे. केवळ देशाची बदनामी होऊ नये म्हणून मी कुणाचे नाव घेत नाही आहे. भारताविरुद्ध अंतिम सामना आपण जिंकू शकलो असतो, पण तो फिक्स केला गेला होता. मी यात खेळाडूंना गुंतवू इच्छित नाही. पण काही लोकांनी हा सामना फिक्स करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.” यावर आता श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धन याने त्यांना निवडणुका जवळ आल्या आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.

https://twitter.com/MahelaJay/status/1273518778941411328 

आपल्या ट्विटर अकॉउंटवरून श्रीलंकेचा माजी खेळाडू आणि २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या जयवर्धनने निवडणुका जवळ आल्या आहेत का? असा प्रश्न केला आहे. सर्कस सुरु झाल्यासारखे वाटते आहे. यासोबत नावे आणि पुरावे कोठे आहेत? असाही प्रश्न त्याने केला आहे. त्याने त्यांची खिल्लीच उडविल्याचे दिसून येते आहे. त्याच्या या ट्विटनंतर श्रीलंकेच्या संघाचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारानेही क्रीडामंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर आपली बाजू मांडली आहे.

अलुथगमगे यांनी पुरावे आयसीसी आणि अँटी करप्शन अँड सिक्युरिटी यांच्याकडे नेण्याची गरज असून  जेणेकरून या दाव्यांची चौकशी त्यांच्याकडून होईल असे संगकाराने म्हंटले आहे. या आरोपांच्या मुळाशी जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलेही अंदाज बांधण्याच्याआधी या प्रकरणातले पुरावे बाहेर येणं गरजेचं असल्याचं संगकारानेसांगितले आहे. २०११ साली तब्बल २८ वर्षांनी भारताने विश्वचषक जिंकला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment