हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेईई मुख्य परीक्षा 2023 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन 2023 ची अधिसूचना जारी केली आहे. जेईई मेन 2023 ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारी 2023 मध्ये आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 मध्ये घेण्यात येईल. जानेवारी सत्रासाठी 15 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करता येतील. 24 जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार आहेत. अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेत बसू इच्छिणारे विद्यार्थी एनटीए जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
JEE मुख्य परीक्षा 2023 मध्ये दोन पेपर असतात. पेपर 1 मध्ये अंडरग्रेजुएट इंजिनीअरिंग प्रोग्राम्स (B.E/B. Tech) असतात, हे परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी NITs, IIITs, इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs) मध्ये अंडरग्रेजुएट इंजिनीअरिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतात. तर पेपर २ हा बी.आर्किटेक्चर आणि बी.प्लॅनिंगच्या प्रवेशासाठीघेतला जातो. दुसरीकडे, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या सत्रात JEE Advanced पास करावे लागेल.
जेईई मेन- 2023 परीक्षा 13 भाषांमध्ये घेतली जाईल जसे की इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू.
JEE मुख्य परीक्षा 2023 बाबत महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या-
ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात- 15 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत सकाळी 9:00 पर्यंत
क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट-बँकिंग/UPI द्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2023 रात्री 11:50 पर्यंत
परीक्षा केंद्र शहरांची घोषणा- जानेवारी 2023 चा दुसरा आठवडा
NTA वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची उपलब्धता- जानेवारी 2023 चा तिसरा आठवडा
जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राच्या तारखा- 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी 2023