उद्धव ठाकरेंची आतेबहीण कीर्ती पाठक यांची भाजपवर खालच्या भाषेत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सध्याचे राजकारण पाहता राजकारणी लोक आपली पातळी सोडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप- प्रत्यारोप करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांची आतेबहिण कीर्ती पाठक (Kirti Pathak) यांनी भाजपवर खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

काय म्हणाल्या कीर्ती पाठक?
‘भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली असून काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो. त्याच रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असतं’, अशी टीका कीर्ती पाठक (Kirti Pathak) यांच्याकडून करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. कीर्ती पाठक (Kirti Pathak) या उद्धव ठाकरेंच्या आतेबहिण आणि ठाकरेंच्या चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आहेत.

शिंदे गटावर साधला निशाणा?
कीर्ती पाठक (Kirti Pathak) यांनी यावेळी शिंदे गटावरदेखील निशाणा साधला आहे. ‘स्वाभीमान हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा. आम्ही त्यांना गद्दार गट हे नाव दिलं आहे, ते त्यांच्या कपाळावर कायम बसलं आहे,’ अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या