सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई शहरालगत असलेल्या यशवंतनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमध्ये शिक्षकाच्या घरी चोरट्यानी चोरी केल्याची घटना घडली. चोरट्याने तब्बल 70 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यशवंतनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमध्ये भूषण रघुनाथ पवार(वय- 40) हे कुटूंबियांसमवेत राहतात. ते व त्यांची पत्नी नीलम या गौरी शंकर फार्मसी कॉलेज येथे नोकरी करतात. घरी त्यांची आई लिलाबाई आणि मुलगा रिसीत असतो. दि. 31रोजी सकाळी 9 वाजता सर्व आटोपून भूषण पवार आणि त्यांच्या पत्नी नीलम हे दोघे कामावर गेले.
सायंकाळी परत 6.30 वाजता आल्यानंतर त्यांना पत्नीने बेडरूममध्ये ड्राव्हरमध्ये ठेवलेले 55 हजार रुपयांच्या सोन्याच्या दीड तोळ्याच्या गोठ टाइप डिझाईनच्या बांगडी, 15 हजार रुपयांची बारीक मण्यासारखी डिझाइन असलेल्या कानातील 3 ग्रॅमची कर्णफुले असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची बाब निदर्शनास येताच त्यांनी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.