हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सध्या कोणालाच हे माहीत नाही की हेमंत सोरेन कुठे आहेत. मात्र दुसरीकडे तोरण यांना शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी भाजपने अकरा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. हेमंत सोरेन हे ईडीच्या भीतीपोटी गायब झाल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आला आहे.
हेमंत सोरेन बेपत्ता झाले असले तरी त्यांच्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांची नजर आहे. अशातच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या भीतीने गायब झाले आहेत. गेल्या 40 तासांपासून त्यांचा काहीच शोध लागत नाहीये. लोकलज्जा सोडून मुख्यमंत्री गायब झाले आहेत. आपलं तोंड लपवून फिरत आहेत” असे बाबूलाल मरांडी यांनी म्हणले आहे.
11 हजारांचे बक्षीस जाहीर
त्याचबरोबर, “हेमंत सोरेन यांच्यावर वैयक्तिकरित्या बेकायदेशीर मालमत्ता आणि घोटाळा केल्याचा आरोप आहे. परंतु मुख्यमंत्री सचिवालयाच्या वतीने ईडीकडे उत्तरे पाठवली जात आहेत. हेमंत सोरेन अचानक बेपत्ता झाल्यामुळे राज्यात घटनात्मक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जो कोणी मुख्यमंत्र्यांबद्दल योग्य माहिती देईल त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिलं जाईल” आवाहन देखील मरांडी यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे रविवारी दिल्लीमध्ये होते. भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार होती. त्यामुळे ईडीचे अधिकारी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. परंतु त्यावेळी सोरेन घरी नव्हते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बराच वेळ त्यांच्या घरी वाट पाहिली. परंतु ते कुठे आहेत? कधी येणार? याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणेत गोंधळ उडाला. सध्या सर्व यंत्रणा हेमंत सोरेन यांना शोधत आहे.