हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स Jio कडून नागरिकांसाठी अनेक प्लॅन ऑफर केले जातात. आताही रिलायन्स जिओकडून FIFA विश्वचषक 2022 पाहण्यासाठी कतारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पाच नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व प्लॅन कतार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया येथे जाणाऱ्या फुटबॉल चाहत्यांसाठीच उपलब्ध असतील असे टेलिकॉम कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना हे इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन jio.com किंवा MyJio App वरून निवडता येतील. हे लक्षात घ्या कि, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 ला सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत फिफा विश्वचषक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय चाहते तेथे जाण्याची शक्यता असल्याने जिओकडून हे खास प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. जिओ कडून काही प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि SMS सारखे बेनिफिट्स देत आहे तर काही प्लॅनमध्ये फक्त डेटा बेनिफिट्स दिले जात आहेत. चला तर मग या प्लॅन्सविषयी जाणून घेउयात…
6799 रुपयांचा रोमिंग प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये 500 मिनिटे लोकल व्हॉईस कॉल्स आणि कॉल बॅक टू इंडिया सोबत अतिरिक्त 500 मिनिटे इनकमिंग कॉल सारख्या सुविधा देखील मिळतील. यासोबतच यामध्ये 5GB डेटासहीत 100 SMS देखील मिळतील. मात्र एकदा वाय-फाय कॉलिंगद्वारे इनकमिंग कॉलची लिमिट संपली की, ग्राहकांकडून 1 रुपये शुल्क आकारले जातील. तसेच, आउटगोइंग कॉल लिमिट पूर्ण झाल्यावर स्टॅंडर्ड PayGo दर लागू होतील.
5122 रुपयांचा रोमिंग प्लॅन
जिओ या 5122 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये कंपनीकडून 21 दिवसांची व्हॅलिडिटी देखील मिळेल. तसेच, फ्री डेटा लिमिट संपल्यानंतर डेटा वापरासाठी स्टॅंडर्ड PayGo दर लागू होतील.
3999 रुपयांचा रोमिंग प्लॅन
Jio च्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये 250 मिनिटे लोकल व्हॉईस कॉल आणि 250 मिनिटे अतिरिक्त इनकमिंग कॉल्स आणि कॉल बॅक टू इंडियाची ऑफर देखील मिळेल. यासोबतच या प्लॅनमध्ये 3GB डेटा आणि 100 SMS देखील दिले जात आहेत. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये वाय-फाय कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, इनकमिंग कॉलची निश्चित मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांकडून 1 रुपये शुल्क आकारले जाईल. या प्लॅनमध्ये देखील आउटगोइंग कॉल लिमिट संपल्यानंतर स्टॅंडर्ड PayGo दर लागू होतील.
1122 रुपयांचा रोमिंग प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनीकडून 1GB डेटा दिला जात असून त्याची व्हॅलिडिटी पाच दिवसांची आहे. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर स्टॅंडर्ड PayGo दर लागू होतील.
1599 रुपयांचा रोमिंग प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनीकडून 15 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये लोकल कॉल्स, कॉल बॅक टू इंडिया आणि इनकमिंग कॉल्ससह 150 मिनिटांच्या व्हॉइस कॉलची सुविधा देखील मिळेल. यासोबतच ग्राहकांना 1GB डेटा आणि 100 SMS देखील मिळणार आहेत. याशिवाय यामध्ये वाय-फाय कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. मात्र, एकदा वाय-फायद्वारे येणार्या कॉलची निश्चित मर्यादा संपली की, ग्राहकांना 1 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, या प्लॅनमधील कॉल लिमिट संपल्यानंतर स्टॅंडर्ड PayGo दर लागू होतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.Jio.com
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर