Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा

Jio
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर लाँच केल्या जातात. आताही जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन Happy New Year 2023 ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप सारखे फायदे दिले जातील. या नवीन ऑफरमध्ये Jio च्या 2,023 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना डेली 2.5GB डेटा आणि 9 महिन्यांसाठी फ्री कॉलिंग देखील मिळेल. त्याचप्रमाणे, 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 75GB चा अतिरिक्त डेटा देखील दिला जाईल.

Jio 5G connectivity to roll out in India by October 2022; company aims at  full coverage by the end of 2023

जिओचा 2,023 रुपयांचा प्लॅन

नवीन वर्षात जिओकडून 2,023 रुपयांचा एक नवीन प्लॅन लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत डेली 2.5GB डेटा, डेली 100SMS आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळेल.

Jio Cheapest Plan Price under Rs 100 Benefits 3GB Data OTT Access and More  | Jio के इस Plan से अच्छा कुछ नहीं! 100 रुपये से कम में पाएं 3GB डेटा और

यासोबतच ग्राहकांना जिओ अ‍ॅप्समध्ये फ्री अ‍ॅक्सेसही मिळणार आहे. तसेच यामध्ये डेली डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps च्या वेगाने डेटा मिळत राहील. हा एक मर्यादित कालावधीचा प्लॅन आहे. जो ग्राहकांना Jio.com किंवा MyJio अ‍ॅप आणि तसेच थर्ड पार्टी अ‍ॅप्सवरूनही सुरु करता येईल.

Reliance Jio Delivered Fastest 4G Download Speed in March 2022

जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन

हे लक्षात घ्या कि, काही दिवसांपूर्वीच जिओकडून 2,999 रुपयांचा प्लॅन लाँच करण्यात आला होता. मात्र आता जिओने यामध्ये काही बदल केले आहेत. ज्यानंतर आता ग्राहकांना 23 दिवसांच्या अतिरिक्त व्हॅलिडिटी सोबत 75GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. तसे पहिले तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 2.5GB डेली डेटा मिळतो. यासोबतच डेली 100SMS, फ्री कॉलिंग आणि Jio अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही दिला जातो.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/

हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा