Jio Recharge Plan : Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन! कॉलिंग- इंटरनेटसह वर्षभर मिळेल Amazon Prime Video चे फ्री सबस्क्रिप्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jio Recharge Plan : देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन आणत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे रिचार्ज अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असतात. जिओ सुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी पैशात आणि जास्तीत जास्त लाभ देणारे रिचार्ज प्लॅन सातत्याने आणत असते. आताही कंपनीने असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेट आणि कॉलिंग च्या सुविधेसोबत संपूर्ण वर्षभर Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. आज आपण या प्लॅनची किंमत आणि त्यातून मिळणारे लाभ याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे या रिचार्ज प्लॅनमध्ये – Jio Recharge Plan

आम्ही तुम्हाला जिओच्या ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल (Jio Recharge Plan) सांगत आहोत त्याची किंमत 3227 रुपये आहे. हा रिचार्ज ३६५ दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षभरासाठी आहे. याचाच अर्थ एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर तुम्हाला रिचार्जची कटकट नाही. या रिचार्ज मध्ये ग्राहकांना दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा म्हणजेच एकूण 730 GB हाय स्पीड डेटा मिळेल. परंतु मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत त्याचे स्पीड कमी होईल. जिओ च्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सह दररोज 100 एसएमएसचा लाभ सुद्धा घेता येणार आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे जिओच्या या 3227 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभरासाठी Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे, मात्र हे सब्स्क्रिप्शन केवळ मोबाइल सबस्क्रिप्शन असणार आहे . याव्यतिरित या प्लानमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud सुविधेचा सुद्धा लाभ देतेय. तुमच्या भागात ५G इंटरनेट सेवा असेल आणि तुमचा मोबाईल सुद्धा सपोर्ट करत असेल तर तुम्ही जिओच्या या रिचार्ज प्लॅन अंतर्गत सर्व ५G सेवेचा लाभ घेऊ शकता.