Ashok Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप!! अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपमध्ये??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ashok Chavan : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे ११ समर्थक आमदार सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा नेत्यांची मोठी लगबग सुरु आहे. बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशासाठीच ही लबबग सुरु आहे असं बोललं जात आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हा सर्वात मोठा हादरा म्हणावा लागेल.

काही महिन्यापासून सुरु होती चर्चा – Ashok Chavan

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे.  गेल्या काही महिन्यापासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरु होत्याच. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले तेव्हा सुद्धा बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा त्यावेळी सुरु होती.

मागील महिन्यात दिग्गज नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण काँग्रेसमधील एक मोठे नेते असून महाराष्ट्र्राचे माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत. त्यांना मोठा राजकीय अनुभव असून राज्यासह देशातही त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. त्याच्या सोबतचे मराठवाड्यातील अनेक आमदार भाजपमध्ये गेल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमधील सर्वात मोठी फूट ठरेल.