हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात इंडियन परिमाणे लीग म्हणजेच IPL चे सामने सुरु आहेत. भारतात क्रिकेट हा एखाद्या धर्माप्रमाणे मानला जात असून सर्वचजण अगदी उत्साहाने आयपीएल सामने बघत असतात. क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे सामने मोफत बघता यावेत म्हणून प्रसिद्ध कंपनी jio ने jiocinema अँप लाँच केलं. या अँपच्या माध्यमातून तुम्ही मोफत आयपीएल सामने बघू शकता. परंतु जिओने आता त्याच्याही पुढे जाऊन यूजर्सना कोणत्याही जाहिरातींशिवाय सामने दाखवण्याची योजना आखली आहे. त्यांसाठी उद्या म्हणजेच २५ एप्रिलला jio २ नवीन प्लॅन्स लाँच करणार आहे. जिओने एक टीझर जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
JioCinema ने X वर एक छोटा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, व्हिडीओमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळे लोक त्रस्त झाले आहेत आणि या जाहिराती बघून कंटाळले आहेत. त्यामुळे कंपनी २५ एप्रिल रोजी नवीन ॲड-फ्री सबस्क्रिप्शन प्लॅन आणत आहे. यपीएलच्या सामन्यांमध्ये अनेक जाहिराती येतात, त्यामुळे मॅच बघताना क्रिकेटप्रेमींना चांगलाच वैताग येतो. परंतु आता जिओ ने नवीन प्लॅन लाँच केल्यानंतर मॅच बघताना तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत. मात्र या नवीन प्लॅनसाठी यूजर्सना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सध्या जिओ सिनेमा दोन प्रकारचे प्लॅन ऑफर करतो. 999 रुपयांचा प्लान आहे जो एक वर्षासाठी आहे. याशिवाय दुसरा प्लॅन 99 रुपयांचा मासिक प्लॅन आहे. तुम्ही जरी हा प्लान घेतला तरी तो पूर्णपणे ॲड फ्री नाही. सध्या JioCinema वर IPL सामने मोफत दाखवले जात आहेत. तुम्ही JioCinema च्या माध्यमातून हव्या त्या भाषेत आणि 360 डिग्री कॅमेरा अँगल मध्ये आयपीएलचे सामने पाहू शकता. आता जिओ २ कोणते प्लॅन लाँच करणार आणि ग्राहकांना त्याचा किती फायदा होणार ते उद्याच समजेल.