पवार फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी ; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमेरिका निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीतपट करून डल जो बायडेन अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. बायडेन यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भाष्य केलं आहे.

अमेरिकेत चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना ५०.५ टक्के तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले आहे.

निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो व बायडेन यांचा फ्लोरिडातील फोटो ट्विट केला आहे. त्याचबरोबर या फोटोवर आव्हाड यांनी भाष्यही केलं आहे

 

“पवार साहेब फॅक्टर अमेरिकेत सुद्धा यशस्वी ठरला आहे. अखंडपणे केलेले कठीण परिश्रम व वचनबद्धताच विजयी ठरते. आशा जिवंत आहेत,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’