JNUSU Elections 2018 | जे.ऐन.यू. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकी दरम्यान अभाविप कडून हिंसा, निकाल आज जाहिर होण्याची संभाव्यता

0
33
JNUSU Election Result
JNUSU Election Result
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | जवाहरलाल नेहरु विद्यापिठाच्या (जे.ऐन.यू.) विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांचे निकाल आज जाहीर होण्याची संभाव्यता आहे. शनिवारी अभाविप कडून विद्यापिठ परिसरात झालेली हिंसा आणि मतमोजनी विरोध यानंतर रात्री उशीराने मतमोजनी सुरु झाली.

शनिवारी जे.ऐन.यू. निवडणूक अधिकार्यांनी मतमोजणी कक्षातील जबरदस्तीचा प्रवेश आणि मतपेटी हिसकावणे आदी कारणांवरुन मतमोजणी स्थगित केली होती. मतमोजणी सुरु असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही असा आरोप करत अभाविप ने मतमोजनी सुरु असलेल्या कक्षात गोंधळ घालून मतमोजनी बंद पाडली. जे.ऐन.यू. प्रशासनाने अभाविप चा आरोप पुसून काढत मतमोजनी सनदशीर मार्गानेच सुरु असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डावे आणि अभाविप यांच्यात धूमचक्री झाली. डाव्या संघटनांनी अभाविप चा निवडणूक प्रक्रियाच बंद पाडण्याचा डाव होता असे म्हणत हिंसेचा निषेध केला आहे. तसेच अभाविप चे कार्यकर्ते हत्यारे घेऊन आले होते असा आरोप केला आहे. मात्र अभाविप ने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले अाहे.

शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत यावर्षी रेकाॅर्ड ब्रेक ७० % मतदान झाले आहे. आजवर झालेल्या मतदानापैकी हे सर्वाधिक मतदान आहे. तेव्हा जे.ऐन.यू. विद्यार्थी परिषदेवर कोणाचा झेडा फडकणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here