पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी; ‘या’ रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संस्थेत (Advanced Institute of Technology) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) आणि वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) या रिक्त जागांवर काम करण्यासाठी तरुणांना संधी देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना याकरिता ऑनलाइन अर्ज (Email) भरावा लागेल. हा अर्ज फक्त 15 मे 2024 पर्यंत करता येईल.

रिक्त पदे आणि अर्जाची अंतिम तारीख

मिळालेल्या माहितीनुसार, प्रगत तंत्रज्ञान संस्थेत ज्युनियर रिसर्च फेलो आणि वरिष्ठ संशोधन फेलोसाठी एकूण 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याकरिता उमेदवारांकडून ईमेल द्वारे अर्ज मागविले जात आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे आहे. या तारखेच्या पुढे करण्यात आलेले अर्ज संस्थेकडून स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता

B.E./ B.Tech/ M.Sc. with First Division with NET/GATE झालेले उमेदवार रिक्त जागेसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

30 वर्षे इतकी असायला हवी

अर्जासाठी ई-मेल पत्ता

[email protected] या ईमेल ऍड्रेसवर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा. तसेच, https://diat.ac.in/ या वेबसाईटवर अधिक माहिती पहावी.

वेतन

निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला 42 हजार रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • [email protected] या ईमेलवर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरतीची जाहिरात पहावी.