महाराष्ट्र वनविभागात नोकरीची संधी; ५०,००० मिळेल पगार, त्वरीत येथे करा अर्ज

0
3
job news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी (Job Requirement) उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात (Forest Department) पशुवैद्यकीय डॉक्टर आणि जीवशास्त्रज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्यावर उपचार, तसेच जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जानेवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

भरतीची माहिती

या भरती अंतर्गत दोन जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून, यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर आणि जीवशास्त्रज्ञ या पदांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी उमेदवाराने B.V.Sc (Bachelor of Veterinary Science) पदवी प्राप्त केलेली असावी, तर जीवशास्त्रज्ञ पदासाठी B.V.Sc किंवा B.Sc (Zoology) पात्रता आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवारांना ऑफलाईन तसेच ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करताना अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठवावी. तसेच, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर (mahaforest.gov.in) उपलब्ध असलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

वेतन आणि वयोमर्यादा

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५,००० ते ५०,००० रुपये वेतन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, भरतीसाठी अर्जदारांची वयोमर्यादा २५ ते ३८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया आणि कालावधी

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ११ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल.

दरम्यान, अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन पाठवताना सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत ई-मेलद्वारे पाठवावी. ऑफलाईन अर्ज पाठवताना संपूर्ण माहिती समाविष्ट करावी. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करावा.