हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल आणि यातील निवडक उमेदवारांना नोकरीची संधी दिली जाईल. (Job Requirements)
कोणती रिक्त पदे भरली जाणार??
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे अंतर्गत GDMO या पदाकरिता एकूण रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची 15 मे 2024 रोजी मुलाखत घेण्यात येईल. यासाठी उमेदवार MBBS असायला हवा. तसेच, या भरतीसाठी 45 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. ही मुलाखत येत्या 15 मे रोजी घेतली जाईल.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी संबंधित उमेदवारांना ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690, बिबवेवाडी, पुणे-37 या पत्त्यावर हजर राहावे लागेल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास https://www.esic.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या. लक्षात ठेवा की, या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर वेळेत हजर राहावे. या मुलाखतीपूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचावी.
मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे
मॅट्रिक प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, दोन फोटो मुलाखतीला जाताना घेऊन जावे.