10वी पास उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

pune job for 10 th pass
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास उमेदवारांसाठी पुण्यात नोकरीची संधी आहे. मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 78 जागांवर होणाऱ्या या भरती अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ हे पद भरले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 07 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – मुख्यालय दक्षिणी कमांड, पुणे
पद संख्या – 78 पदे
भरले जाणारे पद – सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

1. उमेदवाराने 10 वी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणं आवश्यक आहे.
3. सदर उमेदवाराला इंग्रजी आणि हिंदी भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
4. अनुभव असल्यास प्राधान्य.

मिळणारे वेतन – 21,700/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –
प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/