हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना २७३, तर ट्रम्प यांना २१४ मते पडली. बायडेन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७४४७८३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७०३२९९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले. तेथील २० प्रातिनिधिक मते त्यांनी मिळविली. नॉर्थ कॅरोलिनात ट्रम्प, तर अॅरिझोना, नेवाडात बायडेन यांनी विजय मिळविला. सीएनएन या अमेरिकन वृत्तसंस्थेने जो बायडन यांचा लवकरच शपथविधी होणार असल्याचंही वृत्त दिलं आहे.
https://twitter.com/JoeBiden/status/1325118992785223682?s=19
“अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’