पुणे प्रतिनिधी | सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत असणारा जॉगिंग ट्रॅक कोसळल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मागील तीस तासापासून पुण्यात सतत पाऊससुरु असल्याने अशा घटना घडत आहेत. हा जॉगिंग ट्रॅक पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
या अपघातात जीवित हाणी नसली तरी वित्तहाणी मात्र झाली आहे. जॉगिंग ट्रॅकच्या नजीक लावण्यात आलेल्या चार चाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या नजीकच भाजी विक्रेते भाजी विकण्यास बसत असतात. त्यांनी आज पाऊस असल्याने या ठिकाणी दुकान लावले नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती.
दरम्यान २४ तासात अशा प्रकारची हि दुसरी घटना आहे. या पूर्वी पुण्याच्या कोंडवा परिसरात मजुरांच्या झोपडीवर शेजारी असणाऱ्या सोसाईटीची भिंत कोसळल्याने मजूर आणि त्यांच्या घरातील लोक ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. त्यामुळे पुण्यात अशा घटना वारंवारका घडत आहेत. असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.