जोडीदाराच्या पेन्शनसाठी जॉईंट बँक अकाउंट असणे आवश्यक नाही, सरकारने नियम केले शिथिल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारने शनिवारी सांगितले की,”जोडीदाराच्या पेन्शनसाठी (Spouse Pension) जॉईंट बँक अकाउंट अनिवार्य नाही. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की,”केंद्र सरकारने रिटायरमेंट आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व घटकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी नेहमीच काम केले आहे.” अशा लोकांचा अनुभव आणि दीर्घ सेवा आयुष्य लक्षात घेऊन ते देशासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एका अधिकृत स्टेटमेंट नुसार, जर कार्यालय प्रमुख समाधानी असतील की रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या/तिच्या आवाक्याबाहेरच्या कोणत्याही कारणास्तव त्याच्या/तिच्या जोडीदारासोबत जॉईंट अकाउंट उघडणे शक्य नसेल तर ही आवश्यकता शिथिल केली जाऊ शकते.

केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना सल्ला दिला आहे की, जर पती/पत्नी (कुटुंब पेन्शनधारक) कुटुंब पेन्शन मिळवण्यासाठी सध्याचे जॉईंट बँक अकाउंट निवडत असतील तर बँकांनी नवीन अकाउंट उघडण्याचा आग्रह धरू नये.

मात्र, जोडीदारासह जॉईंट बँक अकाउंट असणे इष्ट आहे, असे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सिंग म्हणाले की,” हे अकाउंट्स पेन्शनधारकाच्या इच्छेनुसार “माजी किंवा हयात” किंवा “एकतर किंवा हयात” तत्त्वावर चालविले जातील.”

Leave a Comment