नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने (jos buttler) आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. यादरम्यान जोस बटलरने (jos buttler) भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. नुकत्याच काल पार पडलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीने जास्त कमाल करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त केवळ 22 धावा करता आल्या. या सामन्यात राजस्थानचा 7 विकेट्सनी पराभव झाला, पण बटलरने आपल्या खेळीच्या जोरावर विराट कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.
जोस बटलरने विराट कोहलीचा विक्रम मोडला
जोस बटलरने KKR विरुद्धच्या कालच्या सामन्यात 3 चौकारांच्या मदतीने 25 चेंडूत 22 धावा केल्या आणि या खेळीच्या जोरावर IPL 2022 च्या पहिल्या 10 डावात 588 धावा केल्या. आयपीएलच्या एका मोसमातील पहिल्या दहा डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता तो आता जोस बाटलरने मोडीत काढला आहे, विराट कोहलीने 2016 च्या मोसमात पहिल्या 10 डावात 568 धावा केल्या होत्या. तर बटलरने यंदाच्या मोसमात 10 डावात 588 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता आयपीएलच्या एका मोसमातील पहिल्या 10 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर झाला आहे.
जोस बटलरची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी
जोस बटलरने (jos buttler) यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात आपल्या संघासाठी आतापर्यंत खोऱ्याने धावा केल्या आहेत. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये त्याच्या बॅटने 65.33 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. यादरम्यान बटलरचा स्ट्राइक रेट 150.77 राहिला आहे. यामध्ये 3 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या बॅटने 50 चौकार आणि 36 षटकार ठोकले आहेत तर बटलरची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 116 धावा आहे.
हे पण वाचा
‘या’ 4 घरगुती उपायांनी मानेचा काळेपणा करा दूर
इथं एक पोरगी मिळेना अन् ‘या’ पठ्ठ्यानं चक्क 3 जणींसोबत केलं एकाच वेळी लग्न
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर
ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला राशिद खान