पोलिसांनी पत्रकाराला मारहाण करून अंगावर केली लघुशंका 

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राष्ट्रीय | नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी अटक केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा येथील पोलिसांनी एका पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

दिल्ली-सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डब्बे घसरल्याचे रिपोर्टिग करणाऱ्या एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमित शर्मा यांना जीआरपीच्या पोलिसांनी बेदम मारहाण केली. तसेच, पोलिसांनी दारुणच्या नशेत पत्रकार अमित शर्मा यांना मारहाण करत ठाण्यात घेऊन गेले. यावेळी पोलीस ठाण्यात पत्रकार अमित शर्मा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर पोलिसांनी लघुशंका केली, असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

शामलीतील धीमानपुरा फाटकजवळ मंगळवारी रात्री दिल्ली-सहारनपूर मालगाडीचे दोन डब्बे आणि गार्डचा डब्बा पटरीवरुन घसरले होते. त्यामुळे दोनशे मीटरचा रेल्वे ट्रॅक पूर्णपणे खराब झाला होता. या घटनेचे रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकार अमित शर्मा गेले होते. त्यावेळी जीआरपीचे पोलीस निरीक्षक राकेश बहादूर सिंह आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकार अमित शर्मा यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील मोबाईल आणि कॅमेऱ्याची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले असून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here