ज्युडो कोचने 7 वर्षाच्या मुलाला तब्ब्ल 27 वेळा पटकले, 2 महिने कोमामध्ये राहिल्यानंतर झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तैवान । तैवानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या ज्युडो क्लास (Judo Class) दरम्यान एका प्रशिक्षकाने सात वर्षाच्या मुलाला जमिनीवर 27 वेळा पटकले. यामुळे मुलास अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती. तो दोन महिने कोमात होता. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

21 एप्रिल रोजीचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. 7 वर्षाचा हुआंग ज्युडो शिकत होता. 21 एप्रिल रोजी कोच त्याला काही मुव्ह्ज सांगत होता. यावेळी कोचने वर्गात 27 वेळा हुआंगला जमिनीवर पटकले. यामुळे तो तिथेच बेशुद्द झाला. त्याला फांग युआन रुग्णालयात दाखल केले गेले. काही दिवसांच्या उपचारानंतर हुआंग कोमात गेला, मात्र दोन महिन्यांच्या उपचारानंतरही तो वाचू शकला नाही.

रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने AFP वृत्तसंस्थेला सांगितले की, मुलाच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. या कारणास्तव तो 70 दिवस कोमात होता. मुलाला श्वास घेण्यातही त्रास होत होता. या व्यतिरिक्त त्याच्या बर्‍याच अवयवांनी काम करणे देखील बंद केले होते. अशा परिस्थितीत मंगळवारी त्याच्या पालकांनी त्याला लाइफ सपोर्ट सिस्टममधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

मुलाने नकार दिल्यानंतरही कोच त्याला पटकत राहिला
स्थानिक माध्यमांनी कुटूंबाच्या हवाल्याने असे सांगितले की, कोचने तो मुलगा बेशुद्ध होईपर्यंत फेकणे थांबविले नाही. यानंतर मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्याच्या डोक्यावर अनेक व्रण उठले होते. इतकेच नव्हे तर यादरम्यान हुआंगने कोचला बर्‍याच वेळा थांबायला देखील सांगितले होते, परंतु त्याने ऐकले नाही. असेही म्हटले जात आहे की, मुलाचा काका देखील या क्लास दरम्यान तेथे होते, परंतु तो देखील या कोचला रोखू शकला नाही.

कोचविरूद्ध गुन्हा दाखल
आरोपी कोचवर मुलाला जखमी केल्याचा गुन्हा लावला गेला आहे. कोचविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यानुसार ज्युडोच्या बेसिक मूवमेंट्स माहित नसतानाही त्याने हुआंगला इतर मुलांसमवेत सराव करण्यास सांगितले होते. या व्यतिरिक्त त्याला अनेक वेळा पटकण्यात आले. यावेळी मुलाने डोकेदुखीची तक्रार केली होती, तरीही कोचने त्याला जवळजवळ दोन डझन वेळा फेकले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment