सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा येथील जम्बो कोव्हीड रुग्णालयातील 45 सफाई कर्मचारी आणि वार्ड बॉय यांनी एप्रिल महिन्याचा पगार मे महिना संपत आला असताना झाला नाही. त्यामुळे अचानक रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी ठेकेदारांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या महिन्यातील पगार अद्याप न मिळाल्याने सफाई कर्मचारी आणि वार्ड बॉय यांनी काम बंद केल्याने कोव्हीड रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच यावेळी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर शासनाने पैसे न दिल्याने पगार राहिल्याचा खुलासा व्यवस्थापनाने केला आहे.
जम्बो रुग्णालयाचा कारभार ठरतोय वादाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. रात्री उशिरा कामबंद आंदोलन दरम्यान ठेकेदारांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कोव्हिड सेंटर बाहेर तासभर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यांत चर्चा सुरू होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, लोकांना घटनास्थळावरून हाकलले.