झेंडा ऊंचा रहे हमारा ! विमानातून उडी मारून 22 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी गावचा सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून उडी घेत हवेत आवकाशात तिरंगा फडकवला. पाटण तालुक्याच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यासह पाटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.

पाटण तालुक्यातील चोपदरवाडी गावचे सुपुत्र कमांडो सुरज शेवाळे यांनी जम्मू काश्मिर येथे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त साहसी प्रात्यक्षिक केले. विमानातून आवकाशात झेप घेऊन तिरंगा फडकवला. सूरज यांची ही कामगिरी तालुक्याचा अभिमान वाढवणारी गोष्ट आहे. त्याचा हवेत तिरंगा फडकवतानाचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.  सूरज सन 2017 मध्ये तो सैन्यात भरती झाला आहे. तो सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हवेत उंचावरुन उडी घेत तिरंगा फडकवण्याचा निर्धार त्याने केला होता. सुरज याने ध्वज फडकविल्याचे वृत्त वृतवाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र झाले. त्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. पाटण तालुक्यातील युवकांच्यात सूरजच्या या कामगिरीने आनंदी वातावरण असून सूरजचे अभिनंदनाचे फलक भागात झळकत आहेत.