सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असताना ज्युनिअर आर आर पाटील अर्थात रोहित पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणूक प्रचारातील रोहित यांचे मतदार संघात सध्या चांगलेच गाजत आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार सुमनताई आर आर पाटील यांचा ढवळी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे भाषण केले.
आपल्या भाषणांत ज्युनिअर आर आर म्हणाले कि, ‘दरवेळा पक्ष बदलणारे नेते आता शिवसेनेत गेले आहेत, मात्र सुमनताईना इतकं बहुमत मिळेल की त्यामुळे, विरोधकाना २४ तारखे नंतर शिवधनुष्य घेऊन वनवासात जावे लागेल.’ असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ‘मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवा. फुले शाहू आंबेडकरांचे विचार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे.’ असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
प्रचार सभेत विरोधकांचा समाचार घेत रोहित पुढे म्हणाले कि, ‘निवडणूका जवळ आल्या की विरोधकांच्या मयत भेटी चालु झाल्या आहेत. कावळा शिवो अगर ना शिवो, मात्र विरोधक शिवत आहे.’आमच्या तरुणांच्या मागण्या जर प्रेमाने मान्य होत नसेल तर येत्या काळात त्या हिसकावून घेतल्या जातील’ असा इशाराही रोहित पाटील यांनी दिला. तत्पूर्वी सभेच्या ठिकाणी रोहित घोड्यावरून सभास्थळी आले होते. विशेष म्हणजे यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई त्यांच्या सोबत होती.
इतर काही बातम्या-
संग्राम देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून पुन्हा एकदा माघार, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह
सविस्तर वाचा –https://t.co/f6oPPZpitD@BJP4India @BJP4Maharashtra #paluskadegaon#Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
ना अजित, ना सुप्रिया; ‘हा’ असणार शरद पवारांचा राजकीय वारस
सविस्तर वाचा – https://t.co/pcEdKf9v4M@AjitPawarSpeaks @supriya_sule @RohitPawarSpeak @NCPspeaks @MumbaiNCP #vidhansabha2019#MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019
दोन हजार रुपयांना आम्हाला विकत घेतो काय ? शेतकऱ्याचा सुजय विखेला टोला; दोन हजारांचा चेक पाठवला परत
सविस्तर वाचा- https://t.co/qTAoCIccV9@BJP4Maharashtra @PMOIndia #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 7, 2019