पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ओट्टावा | कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या पत्नी सोफी ग्रेगोर – त्रुडो यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी वेगळी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. संसर्गजन्य आजारातून वाचण्यासाठी पंतप्रधानांनी वेगळी खबरदारी घेतली आहे. आता त्रुडोही घरातूनच देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं निश्चित झालं आहे.

याव्यतिरिक्त देशवासीयांना संबोधित करताना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही त्रुडो यांनी दिला आहे. कॅनडातील आरोग्य सेवा जगभरात विशेष प्रसिद्ध आहेत. यातच एक पाऊल पुढे जात पंतप्रधान त्रुडो यांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणाही केली आहे.

कोरोनाची दहशत सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटी लोक, खेळाडू आणि राजकारणी लोकांमध्येही पसरु लागली आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स, वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज व्हिव्हीयन रिचर्ड्स आणि नंतर कॅनडाच्या पंतप्रधान त्रुडो यांची पत्नी सोफी ग्रेगोर यांनाही कोरोना झाल्याचं समजल्यामुळे जगभरातील नागरिकांनी आता या आजाराकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली आहे.