Monday, January 30, 2023

बिल गेट्सची माइक्रोसाॅफ्टला सोडचिठ्ठी! ‘या’ लोकोपयोगी गोष्टींसाठी करणार काम

- Advertisement -

वाॅशिंग्टन | माइक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहाय्यक संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिल गेट्स माइक्रोसाॅफ्ट कंपनीच्या बाॅर्ड आॅफ डायरेक्टर्स वरुन पायउतार होत असल्याची माहिती एका परिपत्रकाद्वारा कंपनीने नुकतीच जाहीर केली. लोकोपयोगी गोष्टींना वेळ देता यावा याकरता गेट्स यांनी सदर निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

- Advertisement -

गेट्स बोर्ड आॅफ डायरेक्टर्स वरुन पायउतार झाले असले तरी ते कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांना तांत्रिक सल्लागार म्हणुन काम पाहणार आहेत. मायक्रोसाॅफ्ट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार बिल गेट्स आता जागतिक आरोग्य, शिक्षण, विकास आणि तापमानवाढ या विषयांसाठी काम करणार आहेत.

दरम्यान माइक्रोसाॅफ्ट कंपनी माझ्या आयुष्यातील महत्वाच्या कामापैकी आहे. कंपनीचे नेतृत्व मी शेवटपर्यंत करत राहील असे मत गेट्स यांनी व्यक्त केले आहे. १९८६ साली मायक्रॉसाॅफ्ट कंपनी लोकांसमोर आली आणि नंतर वर्षभरातच ३१ वय असणारे बिल गेट्स अरबोपती झाले. मात्र गेट्स यांनी सामाजिक काम कायम सुरु ठेवले.