नवी दिल्ली । केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. याद्वारे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) पायलट लायसन्सिंग आणि वैद्यकीय तपासणीसह 298 सर्व्हिसेस पुरवतील. ऑनलाइन प्लॅटफॉर्म e-GCA लाँच केल्यानंतर केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले की, ” या प्लॅटफॉर्मवर 298 सर्व्हिसेस लाँच करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यात 99 सर्व्हिसेस लाँच करण्यात आल्या तर पुढील दोन टप्प्यात 198 सर्व्हिसेस लाँच करण्यात आल्या.”
पहिल्या टप्प्यात लाँच केलेल्या 99 सर्व्हिसेस पैकी 70-75 टक्के पायलट लायसन्सिंग, वैद्यकीय तपासणी, उड्डाण प्रशिक्षण संस्थांना परवानगी देणे आणि प्रादेशिक कार्यालयांना मुख्यालयाशी जोडण्याशी संबंधित आहेत. पुढील दोन टप्प्यांमध्ये लाँच करण्यात आलेल्या सर्व्हिसेसमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या 30 टक्के सर्व्हिसेसचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की,” e-GCA हे अनेक प्रकारे DGCA चे नवीन व्हर्जन आहे.”
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने तयार केले आहे पोर्टल
ऑनलाइन प्लॅटफॉर्म e-GCA डायरेक्टोरेट जनरल ऑफ पायलट, एअरक्राफ्ट मेंन्टनन्स इंजीनियर्स, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स, एअर ऑपरेटर्स, एअरपोर्ट ऑपरेटर्स, फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गेनायझेशन, मेंन्टनन्स आणि डिझाइन ऑर्गेनायझेशन्सना सर्व्हिसेस देतील. हा प्रोजेक्ट DGCA अंतर्गत 100 दिवसांच्या योजनेचा भाग होता. हे पोर्टल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने तयार केले आहे. DGCA चार वर्षांसाठी ऑनलाइन सर्व्हिस ट्रान्सफर करत आहे. आता ऑनलाइन पोर्टल सुरू झाल्याने रेग्युलेटर्सच्या बहुतांश सर्व्हिसेस ऑनलाइन ट्रान्सफर झाल्या आहेत.
आता 3 दिवसांत मिळणार वैद्यकीय मंजुरी
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की,” DGCA ने सिंगल विंडो बनवली आहे, ज्यामध्ये अनेक सुविधा पुरवल्या जातील. नवीन ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह, सर्व DGCA मंजूरी आता एकाच विंडोमधून मिळवता येतील.” ते म्हणाले की,”वैमानिकांची वैद्यकीय मंजुरी आता 2-3 दिवसांत केली जाईल. पूर्वी हे काम पूर्ण होण्यासाठी महिनाभर लागत असे.” त्यांनी सांगितले की,”पायलट लायसन्ससाठी ऑफलाइन काम केले जात होते, जे आता ऑनलाइन केले जात आहे.”