काँग्रेस पक्ष आता पुर्वीचा काँग्रेस पक्ष राहीला नाही म्हणत ज्योतिरादित्य सिंधियांचा भाजपात प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील भाजप कार्यालयात सिंधिया यांचा भाजप प्रवेश झाला.

काँग्रेस पक्ष आता पुर्वीचा काँग्रेस पक्ष राहिलेला नाही असे म्हणत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी सिंधिया यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टिला केली. माझ्या आयुष्यात दोन लाईफचेंजिंग गोष्टी घडल्या. एक म्हणजे जेव्हा माझे वडील मला सोडून गेले. आणि दुसरी काल जेव्हा मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन माझा वेगळा मार्ग निवडला. असे विधान सिंधिया यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान सिंधिया यांनी जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचे आभार मानले. नड्डा यांनी आपणाला भाजपात येण्याचे आमंत्रण दिल्याचा खूलासाही यावेळी सिंधिया यांनी केला.

Leave a Comment