सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवभक्त कालीचरण महाराज यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.. कालीचरण महाराज हे मूळचे अकोला जिल्ह्यातील असून त्यांची संपूर्ण देशात शिवभक्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे.. भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने आपण प्रसन्न झालो आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं
कालिपुत्र कालीचरण महाराज यांचे शिव तांडव स्तोत्र हे गाणे खूप प्रसिद्ध आहे. आज सातारा येथे आल्यानंतर जलमंदिर पॅलेस येथील तुळजाभवानी मंदिरात भवानी मातेची पुजा अर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिव तांडव स्तोत्र गायिले. त्यावेळी सारे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी काली चरण महाराज यांचा सातारी कंदी पेढे, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
कोण आहेत कालीचरण महाराज-
कालीचरण महाराज’ अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतात. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. कालीचरण महाराज ‘कालीमाता’चं आपली ‘आई’ असल्याचं मानतात. तर ते स्वत:ला अगस्ती ऋषींचा शिष्य मानतात. कालीचरण महाराजांच्या स्टाईलची भूरळ अनेकांना पडतेय. जरीचे लाल कपडेच ते वापरतात. जरीची काठाची लुंगी, लाल रंगाचं ‘टी शर्ट’, त्यावर जरीचा लाल रंगाचा पंचा, कपाळभर गर्द लाल रंगाच्या कुंकवाचा कोरीव गोल टिळा, ‘ट्रिम’ केलेली दाढी, व्यवस्थित रुद्राक्षाच्या माळा लावलेल्या जटा अन गळ्यातही रुद्राक्षांची आकर्षक माळ.