हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याचा आहे की केंद्राचा यावरून नेत्यांमध्ये खडाजंगी होत आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील काले गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
आज 16 जून रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राबविण्यात आली. ‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून नरेंद्र मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभरातून एक कोटी पत्र पाठविण्यात येणार आहेत याची घोषणा युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आज काले मधून सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मा. अविनाश मोहिते (दादा) तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कराड दक्षिण उपाध्यक्ष सागर भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शना खाली, पत्र पाठवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते अभिषेक यादव, विनय देसाई, मयूर देसाई, आविष्कार यादव, तुषार यादव, शुभम करंजकर उपास्थित होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.