हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती. अनेक लोकांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर आज कालीचरण महाराज याना अटक करण्यात आली आहे.
कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले-
छत्तीगडची येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे