कलिंगड मालवाहतूक एसटी पाचशे फूट खोल दरीत कोसळली; चालकासह दोघे गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा :- महाड वरून कलिंगड भरून सातारच्या दिशेने येणारी देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतूक एसटी केळघर घाटात पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मालवाहतुक एसटीच्या चालकासह आणखी एक सहकारी असे दोघेजण जखमी झाले आहेत.

सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतुक एसटी महाडवरुन साताऱ्याकडे कलिंगड घेऊन येत होती. ही एसटी केळघर घाटात आल्यावर काळाकडा जवळ एक अवघड वळण घेताना चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटले आणि एसटी पाचशे फूट खोल दरीत कोसळली.

जवळच असणाऱ्या मुकवली ग्रामस्थांना या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघाता जखमी झालेले चालक व सहकारी यांना वाचविण्यात ग्रामस्थाना यश आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment