डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार दिल्याने नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये काही नशेखोरांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याने केमिस्टच्या दुकानाची तोडफोड केली आहे. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स औषध देण्यास केमिस्टने नकार दोघा तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. तोडफोड करतानाची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1500076753725063168

काय आहे प्रकरण?
घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आरोपी तरुण बनेली परिसरात डॉ. आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मात्र मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही, असे त्या आरोपी तरुणांना डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले. या आरोपींनी मेडिकल चालकाला विनंती केली मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला.

यानंतर संतापलेल्या या दोन्ही नशेखोर आरोपी तरुणांनी मेडिकल चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मेडिकलचा आणि दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. तसेच काऊण्टर वरील औषधे अस्ताव्यस्त फेकली. हि संपूर्ण घटना मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Leave a Comment