Sunday, April 2, 2023

संजय मिश्राच्या’कामयाब’चा ट्रेलर रिलीज,शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेला हा चित्रपट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता संजय मिश्रा यांच्या आगामी ‘कामयाब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात संजय मिश्रा वेगवेगळ्या पात्राची भूमिका साकारताना दिसतील. ‘कामयाब ट्रेलर’ मध्ये बॉलिवूडच्या साइड अभिनेत्यांशी संबंधित काही आंबट आणि गोड कथा दाखवण्यात आली आहे.या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेनमेंटने केली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

संजय मिश्रा यांच्या ‘कामयाब’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर त्याला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये संजय मिश्रा, दीपक डोबरियाल यांच्यासमवेत सारिका सिंग आणि ईशा तलवार यांच्यासारखेअनेक प्रतिभावान कलाकारही दिसणार आहेत.’कामयाब’च्या ट्रेलरला आतापर्यंत 88,000 हून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी केले असून त्यांनी आपल्या ‘अमदावाद मा फेमस’ या शॉर्ट फिल्म साठी राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे.

- Advertisement -

गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा निर्मित ‘कामयाब’ हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट रेड चिलीज एन्टरटेन्मेंट फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत सादर केला आहे. या चित्रपटाद्वारे सहकारी कलाकाराच्या भूमिकेत असणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दर्शविल्या जाणार आहेत. प्रेक्षकांनाही या चित्रपटाचा ट्रेलर खूपच आवडला आहे.त्यामुळे लवकरच एक दर्जेदार चित्रपट लोकांना पाहायला मिळेल याची अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.