सनरायझर्स हैदराबादने कर्णधारच बदलला; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाच्या आयपीएल मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार च बदलला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर कर्णधार पदावरून पायउतार झाला असून न्युझीलंड चा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन संघाचे नेतृत्व करेल .

याबद्दल हैदराबादने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘केन विलियम्सन उद्याच्या(२ मे) सामन्यात तसेच उर्वरित हंगामात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. खर तर ‘हा निर्णय सोपा नव्हता. संघव्यवस्थापनाला डेव्हिड वॉर्नरच्या कित्येक वर्षांपासून फ्रँचायझीवर असलेल्या परिणामांचा आदर आहे. आम्हाला विश्वास आहे की वॉर्नर मैदानात आणि मैदानाबाहेर उर्वरित हंगामासाठी योगदान देत राहिल.

दरम्यान यंदा सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. 6 सामन्यात फक्त एक विजय मिळवून हैदराबाद गुणतालिकेत तळाला आहे.