मी देशात कुठेही फिरू शकते ; कंगनाचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटते अस वक्तव्य केल्या पासून कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक वॉर रंगल आहे. नुकतंच कंगणाने ट्विटर वर व्हिडिओ शेअर करून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.संजय राऊत तुम्ही मला हरामखोर मुलगी म्हणलात. तुम्ही एक राजकारणी आहेत, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की आपल्या देशात प्रत्येक तासाला किती मुलींवर बलात्कार होतो, किती मुलींचं शोषण होत.मुलींच्या शरीराचे तुकडे करुन फेकले जात आहेत. मुलींना शिव्या दिल्या जात आहेत. याला जबाबदार कोण आहे?? याला जबाबदार आहे ती मानसिकता त्याच प्रदर्शन तुम्ही साऱ्या जगापुढे सादर केले. त्यामुळे या देशातील कोणतीही मुलगी तुम्हाला माफ करणार नाही, अस कंगणा म्हणाली आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302542975721848839?s=20

कंगना पुढे म्हणाली, “तुम्ही त्या सर्व लोकांचं महिलांविरुद्ध सुशक्तीकरण केलं आहे.जेव्हा अमीर खान म्हणला की मला या देशात राहायला भीती वाटते तेव्हा तुम्ही कोणीच त्याला हरामखोर म्हणला नाही.सुशांतच्या वडिलांचा एफआयआर कोणी घेत नव्हतं.म्हणून मी प्रशासनावर टीका केली हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.मी तुमचीही निंदा करते, तुम्ही म्हणजे काही महाराष्ट्र नाही आहात.आणि तुम्हला मी काय बोलले तर तुम्ही अस म्हणूच शकत नाही की मी महाराष्ट्रला बोलले”.

मी आता 9 सप्टेंबर ला मुंबईत येणार आहे. तुमची माणसे मला म्हणत आहेत की ते मला मारून टाकतील.तुम्ही मला मारा कारण या देशाच्या  मातीत अनेक लोकांनी या देशाच्या  अस्मिते साठी आपले प्राण दिले आहेत.आणि मी सुद्धा देईन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment