आता काळजीपूर्वक करा व्यवहार, लहान आणि दैनंदिन खर्चावर IT डिपार्टमेंट ठेवून आहे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता काळजीपूर्वक व्यवहार करा कारण आता आयकर विभाग आपल्या मोठ्या व्यवहारासह छोट्या आणि मध्यम व्यवहारावर नजर ठेवून आहे. म्हणूनच त्याचा हिशेब ठेवणेही महत्त्वाचे आहे. पूर्वी आयकर विभाग क्रेडिट कार्डवर 2 लाख रुपये खर्च करणे, 30 लाख रुपयांहून अधिकची मालमत्ता खरेदी करणे, बँकेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट असणे यासारख्या उच्च मूल्यांचे व्यवहार पाहत असे. पण आता आयकर विभाग आपल्या दररोजच्या खर्चावर देखील लक्ष ठेवून आहे. आयटी विभाग कोणत्या खर्चावर नजर ठेवून आहे ते जाणून घ्या …

आता या खर्चावर असेल आयटी विभागाची नजर-
>> शैक्षणिक शुल्क वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दिले जाणे
>> वर्षाकाठी 1 लाख रुपयांहून अधिक वीज बिल भरणे
>> मालमत्ता कर वार्षिक 20,000 रुपयांपेक्षा अधिक भरला जाणे
>> हॉटेल खर्च 20,000 च्या वर येणे
>> व्हाइट गुड्स जसे की टीव्ही, फ्रीझ, फोनच्या खरेदीसाठी 1 लाखाहून अधिक रुपये खर्च करणे
>> आरोग्य विम्याचा प्रीमियम 20,000 रुपयांहून अधिक भरणे
>> विमा प्रीमियम प्रतिवर्षी 50,000 रुपयांपेक्षा अधिक भरला जाणे
>> बिझिनेस क्लासने परदेशी तसेच देशांतर्गत प्रवास
>> डिमॅट व्यवहारासह शेअर्सची खरेदी-विक्री
>> दरमहा 40,000 पेक्षा जास्त भाडे देणे
>> आयकर विभाग बँकेतील लॉकरवरही लक्ष ठेवणार आहे.

या व्यतिरिक्त आणखी एक मोठी यादी आहे. म्हणजेच करदात्यांना आता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की, जर त्यांचा खर्च त्यांच्या मिळकतीशी किंवा तुमच्या खर्चाशी जुळत नसेल आणि तुम्ही तुमची बचत वापरली असेल तर तुम्हाला त्यास उत्तर देण्यास तयार असावे. म्हणून, आपल्या खर्चाचा हिशेब ठेवा. प्राप्तिकर विभागाने नुकतीच त्याबाबतची एक संपूर्ण यादी जाहीर केली होती. मात्र नंतर हे ट्विट मागे घेण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like